येत्या 3 दिवसांवर म्हणजे 6 सप्टेंबर रोजी अंनत चतुर्दशी 6 शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कपिलेश्वर जुना व नव्या तलावावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही ठिकाणी त्या दिवशी सकाळच्या सत्रात 60 अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तर रात्रीच्यावेळी 40 अधिकारी व कर्मचारी तैनात असणार आहेत. याबाबतचा आदेश मनपा आयुक्त शुभा बी. यांनी जारी केला आहे.
शहरात ३८० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी सर्वाधिक मंडळांकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी जुन्या आणि नव्या कपिलेश्वर तलावाकडे आणल्या जातात. त्याचबरोबर जक्कीन होंड, अनगोळ येथील लाल तलाव, कलमेश्वर तलाव जुने बेळगाव, ब्रह्मदेव मंदिर मजगाव, किल्ला तलाव, कणबर्गी व नाझर कॅम्प वडगाव या ठिकाणीही गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या तलावांच्याठिकाणी महापालिकेकडून यापूर्वीच आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
विसर्जनासाठी कपिलेश्वर तलावाजवळ मनपाचे १०० कर्मचारी अधिकारी तैनात
