तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास काकतीत उघडकीस आली. भावकाण्णा यल्लाप्पा तळवार (वय २८, रा. मठ गल्ली, काकती) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, भावकाण्णा हा गेल्या दोन-तीन वर्षापासून काहीही काम धंदा न करता फिरत होता. त्यामुळे, त्याला अनेक व्यसनांचीही सवय लागली होती. यातून त्याची मानसिक स्थिती
बिघडली होती. घरात सातत्याने आपण मरुन जातो अशी तो धमकीही देत होता. बुधवारी सायंकाळी तो घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री किती वाजता घरी आला हे कुटुंबियांनाही माहित नाही. गुरुवारी सकाळी त्याने राहत्या घरातील बेडरुममध्ये बेडशीटने स्लॅबच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.