सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ श्री राजा शिव छत्रपती युवक मंडळ कोनवाळ गल्ली छत्रपती शिवाजी रोड बेळगाव या मंडळाच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी महाप्रसादाचा आयोजन केलं होतं. या कार्यक्रमा च्या निमताने रुग्ण सेवक प्राचार्य आनंद अरुण आपटेकर वैद्यकीय समन्वय, महाराष्ट्र एकीकरण समिती व कार्यकारी सचिव मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेळगाव यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी व लक्ष्मण किल्लेकर यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .मागच्या वर्षी 5 सप्टेंबर 2024 रोजी कोनवाळ गल्लीतील एक रुग्ण प्रशांत हांडे किडनी ट्रान्सप्लांट ची गरज होती. विविध प्रसार माध्यमातून मदतीचा आव्हान ही सुद्धा केलं होतं. त्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 2,00,000 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या वेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी विलंब न करता ती निधी उपलब्ध करून दिले .आज या गणेश उत्सवा गणेश उत्सव दरम्यान त्या घटनेला एक वर्ष होतं . आज प्रशांत हांडे ची तब्येत पुन्हा पहिले सखी ठीक झाली आणि आज तो पुन्हा आपल्या नोकरी व्यवसायात कार्यरत आहे. एका युवकावर आणि घरचा प्रमुख असणाऱ्या व्यक्ती वरती असं संकट येणे म्हणजे पूर्ण घरावर संकट आल्यासारखं आहे. आपटेकर यांनी विघ्नहर्ता कडे प्रार्थना केली की असे संकट कोणावर येऊ नये आणि आल्यास तर निश्चित आम्ही सर्वजण अशा रुग्णाला मदत करून त्यांना संकट समोर जाण्यासाठि कार्यात राऊ. आपटेकर यांनी समिती नेते रमाकांतदादा कोंडुस्कर ,तज्ञ समिती अध्यक्ष माननीय खासदार धैर्यशील माने ,मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती चे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांचे आभार मानले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी रोड मंडळाचे अध्यक्ष विनायक पवार, मदन अष्टेकर, कुंज नावगेकर, महेश नावगेकर, कुणाल हांडे, आकाश हांडे, प्रदीप किल्लेकर, शिवम उरणकर व महिला मंडळ उपस्थित होते.
रुग्णसेवक,प्राचार्य आनंद आपटेकर यांचा सत्कार
