गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील रहदारी मार्गात बदल करण्यात आल्याचे पत्रक पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्ध दिले आहे. नरगुंदकर भावे चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होणार असून कपिलेश्वर तलावाजवळ सांगता होणार आहे. या मार्गात
येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील रहदारी अन्य मागनि वळविण्यात येणार आहे. मार्गातील हा बदल शनिवारी (दि. ६) दुपारी दोनपासून रविवारी (दि. ७) मिरवणूक संपेपर्यंत राहणार आहे.
किल्ला तलावाकडून अशोक सर्कलमार्गे आरटीओ सर्कल, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोडमार्गे आत येणारी वाहने एसपी ऑफीस, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्यानगर, अरगन तलाव, गांधी सर्कल, ग्लोब थिएटर मार्गे खानापूर रोडकडे सोडण्यात येणार आहेत. खानापूर रोडमार्गे येणारी सर्व वाहने मिलिटरी महादेवपासून कॅम्पमधून आत सोडून ती मिलिटरी हॉस्पिटलमार्गे गांधी सर्कल व तेथून हिंडलगा गणपती मंदिर, हनुमाननगर डबल रोड पासून बॉक्साईट रोडमार्गे राष्ट्रीय महामार्गावर सोडण्यात येतील. गोगटे सर्कलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहने गोवावेस सर्कल, नाथ पै सर्कल, खासबाग बसवेश्वर सर्कल, संभाजी गल्लीतून पुढे सोडली जाणार आहेत. नाथ पै सर्कल कडून बँक ऑफ इंडिया, एसपीएम रोड मार्गावरुन कपिलेश्वर उड्डाण पुलाकडे जाणारी वाहने खासबाग बसवेश्वर सर्कलमार्गे पुढे सोडली जाणार आहेत.
जिजामाता सर्कलकडून देशपांडे पेट्रोल पंपाकडे जाणारी वाहने थेट जिजामाता
सर्कलमधून पॅटसन शोरुममार्गे जुन्या पीबी रोडवरुन पुढे सोडली जाणार आहेत. जुन्या पीबी रोडवरुन व्हीआरएल लॉजिस्टिक, भातकांडे स्कूलपासून कपिलेश्वर ओव्हर ब्रिजकडे जाणारी वाहने संभाजी रोड तसेच बसवेश्वर सर्कलमार्गे खासबाग नाथ पै सर्कलकडे सोडली जाणार आहेत. गुड्स शेड रोडमार्गे कपिलेश्वर ओव्हरब्रिजकडे जाणारी वाहने मराठा मंदिर गोवावेस सर्कलकडे सोडली जाणार आहेत. मिरवणूक मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहने जाणारे रस्ते मिरवणूक काळात पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.