5 सप्टेंबर 2025 रोजी ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मातील एक सण या सणाचा औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक पिरणवाडी येथील श्री बालगणेश गणेशोत्सव मंडळाने आजच्या आरतीचा मान हा मुस्लिम बांधवांना दिला, या ऐक्यामुळे पिरणवाडी भागांमध्ये हिंदू मुस्लिमांचे ऐक्य दिसून आले,मुस्लिम बांधवांनी आपल्या ईद-ए-मिलाद निमित्त समाजात ऐक्य नांदावे व श्रीगणेशाने सर्वांना सुखी ठेवावे अशी प्रार्थना केली.
यावेळी नारायण मुचंडिकर, गणेश मंडळाचे अनेक कार्यकर्ते व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
पिरणवाडीत हिंदू मुस्लिम ऐक्यात दिसला गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद
