कॉलेज ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन लिंगराज कॉलेजतर्फे आयोजित पेन्सिल ड्रॉईंग स्पर्धेत जीएसएस कॉलेजच्या विनीत उमेश आपटेकर याने अभिनंदन यश मिळविले आहे.
शहरातील आरएलएस कॉलेजमध्ये गेल्या 9 व 10 नोव्हेंबर रोजी वरतंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पेन्सिल ड्रॉईंग प्रकारात विनीत आपटेकर याने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. जीएसएस महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षात (विज्ञान) शिकणारा विनीत हा माजी सैनिक उमेश आपटेकर यांचा चिरंजीव आणि नैऋत्य रेल्वेचे अधिकारी मि. इंडिया सुनील आपटेकर यांचा पुतण्या आहे. उपरोक्त यशाबद्दल त्याचे महाविद्यालयात अभिनंदन होत आहे.