बबन भोबे मित्रमंडळ, बेळगाव आणि स्वामी विवेकानंद रिक्षा स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि आश्रमातील मुलांना फराळाचे वाटप करून दीपावली साजरी करण्यात आली.
सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप राज्य ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पाडण्यात आला.
यावेळी बोलताना किरण जाधव यांनी, बबन भोबे यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. तसेच फराळ वितरीत केल्यानंतर उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
परमेश्वर सर्वांना सुख, समृद्धी समाधान, ऐश्वर्य आणि आरोग्य देवो, आणि दीपावलीच्या दिव्यांनी समाजातील कर्तृत्ववानांचे कर्तृत्व उजळून निघूदे अशा शुभेच्छा किरण जाधव यांनी उपस्थितांना दिल्या.
यावेळी बबन भोबे मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बबन भोबे, मित्रमंडळाचे पदाधिकारी, स्वामी विवेकानंद रिक्षा स्थानक पदाधिकारी आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी आणि आश्रमातील मुलांना फराळाचे वाटप
