मच्छे येथील शेतवडीतील गवतगंजी अज्ञातानी पेटवून दिल्याने सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले आहे. दि. १७ रोजी सायंकाळी मच्छे येथील श्री ब्रम्हलिंग देवस्थानच्या समोरील शेतवडीतील पिंजरची गवतगंजी अज्ञातांनी पेटविल्यानेच जळून खाक झाली.
त्यामुळे येथील शेतकरी गजानन यल्लाप्पा चौगुले यांचे सुमारे दहा हजाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गुरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मच्छे गावावर पट्टण पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून गजानन चौगुले यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी नागरिकांनीकेली आहे