शिवाजीनगर, पाचवी गल्ली येथील होळी कामण्णा ट्रस्टच्यावतीने होळी कामण्णा मंदिर प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण सोहळा बुधवार दि. २१ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ७ ते ११.३० या वेळेत प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण होणार आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सोमवारी या मंदिराची वास्तूशांती करण्यात आली. सायंकाळी कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
शिवाजीनगर परिसरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. उद्घाटन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी केले आहे.