इचलकरंजी येथील आयएमसी क्लबतर्फे इचलकरंजी महापालिका जलतरण तलाव येथे अलीकडेच निमंत्रितांच्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत स्विमर्स व एक्वेरियर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी यश संपादन केले आहे
स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी इचलकरंजीयेथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेवर वर्चस्व राखताना 31 सुवर्ण, 13 रौप्य व 10 कांस्य पदकांसह एकूण 54 पदकांची लयलूट करत चार वैयक्तिक अजिंक्यपदे, तसेच स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले आहे.
यामध्ये अनिश कोरे -5 सुवर्ण पदकं. पाखी हलगेकर -4 सुवर्ण, 1 कांस्य. सुनिधी हलकरे -3 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य. निधी कुलकर्णी -3 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य. जिशांत भाटी -2 सुवर्ण, 3 रौप्य. दर्शिका निट्टूरकर -2 सुवर्ण, 1 कांस्य. सार्थक श्रेयकर -2 सुवर्ण. अमन सुनगार -1 सुवर्ण, 4 रौप्य. हर्ष चव्हाण -1 सुवर्ण, 1 रौप्य. समृद्धी हलकरे -1 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य. वेदांत मिसाळे -1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य. अहिका हलगेकर -1 सुवर्ण. वृद्धी शानभाग -1 सुवर्ण. साईश पाटील -1 सुवर्ण. स्वरा कलाखांबकर -1 सुवर्ण. भगतसिंग -1 सुवर्ण. स्कंध घाटगे -1 सुवर्ण. यशराज पावशे -1 रौप्य, 2 कांस्य. सर्वदा सिद्धेश -1 रौप्य. अनिश पै -1 रौप्य. ओजस हुलजी -1 रौप्य. अभिनव देसाई -1 रौप्य, 1 कांस्य. गाथा जैन -1 रौप्य, 1 कांस्य. तनिष भाटी -1 कांस्य. या जलतरणपटुंपैकी अनिश कोरे, सुनिधी हलकरे, सार्थक श्रेयकर व पाखी हलगेकर यांनी आपापल्या गटाचा वैयक्तिक अजिंक्य पदाचा करंडक हस्तगत केला.
सर्व यशस्वी जलतरणपटू केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव येथे पोहोण्याचा सराव करतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो अविनाश पोतदार, माणिक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.