बेळगांव येथील लोकमान्य रंगमंदिरच्या सभागृहात फ्लाईंग फिट स्पोर्ट्स कराटे अकादमी आयोजित कराटे ब्लॅक बेल्ट परिक्षेत सेंट झेवियर्स शाळेची विद्यार्थिनी आराध्या निवास सावंत हिने मानाचा ब्लॅक बेल्ट किताब पटकाविला.
प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल पवनकुमार शर्मा, संत संस्कार इंटरनॅशनल शाळेचे मुख्याध्यापक इरगौडा पाटील, प्रशिक्षक विनायक मोरे, चेतन मोरे यांच्याहस्ते आराध्या निवास सावंती हिला ब्लॅकबेल्ट देऊन गौरविण्यात आले, आई सपना सावंत, भाऊ निखिल सावंत यांचा ही गौरव करण्यात आला. तिला कराटे प्रशिक्षण ऋतुराज कानुरकर प्रांजल पोटे, चेतन मिटगार, सेंट झेवियर्स शाळेचे क्रीडाशिक्षक दीपा सत्तेगिरी, जुल्येट फर्नांडिस, चेस्टर रोझारियो यांचे मार्गदर्शन यांचे मार्गदर्शन तर शाळेचे प्राचार्य फादर सिरीयल बिग्रस यांचे प्रोत्साहान लाभत आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेव गावडे यांनी तर सपना सावंत यांनी आभार मानले.
कराटे स्पर्धेत आराध्या निवास सावंतला ब्लॅकबेल्ट
