No menu items!
Monday, December 23, 2024

मराठी शाळा टिकविण्यासाठी आवाहन

Must read

मातृभाषा व संस्कृतीसर्व सरकारी शाळा वाचवण्याबाबत टिकवण्याबाबत भव्य अभियान रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता मौजे हेबाळ येथे होणार आहेएसडीएमसी कमिटी आणि शिक्षणप्रेमी व खेळाडू प्रेमी संपूर्ण खानापूर तालुक्यासाठी आव्हान करत आहोतआपली मातृभाषा व आपले संस्कृती जपणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
असे आपल्या संविधान मध्ये लिहिलेले आहे.
आणि प्रत्येकाने आपली मातृभाषा व संस्कृती जपणं हे त्याचे परम कर्तव्य आहे, असे मी मानतो. आज माणसाने खूप प्रगती केली. खूप उच्च शिक्षण मिळवले. परंतु संस्कृतीचा अभाव त्याच्यात दिसून येतो. कारण गुण मिळविले पण गुणवत्ता मिळविली नाही. गेल्या 30 35 वर्षाच्या पाठीमागे जास्तीत जास्त संस्कार घरातून आणि समाजातून दिले जायचे. कारण तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत असल्याने आई-वडील, आजी आजोबा, काका काकू इतर मोठ्यांकडून आपल्या संस्कृतीचे बाळकडू दिले जायचे. पण आज पूर्णता विभक्त कुटुंब पद्धत असल्यामुळे आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे पालकांना आपल्या आपल्याकडे विशेष लक्ष देता येईना. प्रत्येकाची इच्छा आहे की, आपलं मूल खूप शिकावं, सुसंस्कृत व्हावं. त्यांनाही कल्पना नाही की संस्कृती ही त्याच्या मातृभाषेतच असते. एखादी नवीन गोष्ट मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना जितक्या प्रभावीपणे समजते. तितक्या मातृभाषा सोडून इंग्रजी अथवा अन्य भाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना समजत नाही. कारण मातृभाषेमुळे मुलांना अनेक शब्दांचे पर्यायी समानार्थी शब्द माहित असतात. त्यामुळे त्यांना ती माहिती पूर्णपणे समजते. तेव्हा ते मूल त्याबद्दल प्रभावीपणे स्वतःच्या शब्दात मांडू शकते. म्हणूनच युनेस्कोने शिक्षण व मातृभाषेबद्दल म्हटले आहे की, सर्वप्रथम सांप्रतकाळी विकासासाठी सर्वात महत्त्वपूर्ण क्षेत्र ज्ञान विज्ञान आणि भाषेच्या संबंधातील विषयांमध्ये आंतरराष्ट्रीय ज्ञान आणि कल्पनांवर नजर टाकणे योग्य होईल. वरील वाक्य U N O शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती समिती( UNESCO) युनेस्को चे पुस्तक ‘शिक्षणात स्थानिक भाषांचा वापर’ मधून घेतले आहे .
हे स्वयंसिध्द आहे की, मुलांसाठी शिक्षणाचे सर्वात उत्तम माध्यम त्यांची मातृभाषा आहे.
सर्व सरकारी मातृभाषा शाळा जपल्या पाहिजे अभियान
विश्वभारती कला क्रीडा संघटना शाखा खानापूर

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!