बेळगाव : सांबरा येथील विमानतळाच्या जागेसाठी झालेल्या भूसंपादनांसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास जिल्हा प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. सुमारे पाच कोटी रुपये इतकी थकबाकी प्रशासनाने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. या भरपाई रकमेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर खटला भरला आहे. तसेच थकीत भरपाई देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी भरपाईतील काही रक्कम देण्यात आली. मात्र उर्वरित रक्कम देण्यास दिरंगाई करण्यात आली आहे यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीचा आदेश बजवण्यात आला. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. यानुसार प्रांताधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्ची, संगणक आदी साहित्यासह जप्तीची कारवाई करण्यात आली.
प्रांताधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की
By Akshata Naik
Next articleमराठी शाळा टिकविण्यासाठी आवाहन