बेळगाव : रामकृष्ण मिशन आश्रमबेळगावतर्फे स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांनी रिसालदार गल्ली येथील आश्रमात १६ ऑक्टोबरपासून तीन दिवस वास्तव्य केले होते. याचे औचित्य साधून बुधवार दि. १६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हे स्मारक खुले ठेवण्यात येणार आहे.यानिमित्त सायंकाळी ५.४५ वा. मराठी आणि कानडी भाषेमध्ये भजन व प्रवचन होणार आहे. तर ७.१५ वाजता स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित कळसूत्री बाहुल्यांचा खेळ ‘रंगपुत्थळी कठपुतळी संघ बेंगळूर’ यांच्यातर्फे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे