महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्या निमित्ताने मराठी पत्रकारांचा सन्मानकाही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मराठी भाषिकांच्या वतीने अनेक वर्षाच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सर्व मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याचे औचित्य साधून युवा समितीच्या वतीने बेळगावमधील मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि मराठीवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्याचे काम बेळगावमधील सर्व मराठी भाषिक पत्रकार करत असतात, त्याच्या कार्याची दखल घेवून हा सन्मान देण्यात येणार आहे. हा सन्मानाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वा. “कावळे संकुल, टिळकवाडी बेळगाव” येथे संपन्न होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधू भगिनींनी, युवा समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, राजू कदम सिद्धार्थ चौगुले, सरचिटणीस श्रीकांत कदम आणि सर्व युवा समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्या मराठी पत्रकारांचा सन्मान
By Akshata Naik
Previous articleराज्यस्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धा 2024
Next articleरामकृष्ण मिशन आश्रमतर्फे उद्या कार्यक्रम