No menu items!
Thursday, November 14, 2024

हालगा-मच्छे बायपासचे बेकायदेशीर काम सुरु करुन महामार्ग प्राधिकरणाने घेतला जूनेबेळगाव येथील शेतकऱ्याचा बळी

Must read

गेल्या 2011 पासून आजपर्यंत बेकायदेशीर तसेच शेतकऱ्यांची सहमती न घेता,विरोधी आंदोलन मोडित काढत मा.न्यायालयाचा आदेशही पायदळी तुडवत महामार्ग प्राधिकरण खाते पोलिस खात्याच्या मदतीने ठेकेदार हालगा-मच्छे बायपास करण्यात गुंतले आहे.2011 पासूनते आजपर्यंत या पट्यात अनेकांनी धास्तीने तसेच,आत्महत्या करुन घेत अनेक शेतकऱ्यांनी जिवन संपवले.मच्छे येथील युवा कार्यकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.डोक्यावर परिणाम होऊन शेतकरी व महिला सैरभैर होऊन वेडे होत आपल घरही सोडून गेले.त्याची रितसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आता परत गेल्या कांही दिवसापासून मा.न्यायालयात दावा प्रलंबीत असतानांही तिकडे दुर्लक्ष करत ठेकेदारने बायपासचे काम सुरु केल्याने जूनेबेळगाव येथील छोटा शेतकरी यल्लाप्पा चन्नाप्पा टपाले.वय 65 हे आपल्या शेतात पीक लावल आहे ते तर जाणारच पण वडिलधाऱ्यानीं राखलेली शेती आपल्या हयातीत घालवणार या धास्तीने पूढे काय खाणार अशा घोराने जमीन धरली होती.

बुधवार दिं 13/11/2024 रोजी दुपारी जीव गेल्याने त्यांचा महामार्ग प्राधिकरणाने बळी घेतला यात तिळमात्र शंका नाही. त्यांची पत्नी बायपासमधील शेतकऱ्यासमवेत प्रत्येक आंदोलणातच नव्हे तर मा.उच्च न्यायालयात दावा असतानां सुनावनीवेळी जातिने हजर रहात असे.हि शेतकरी महिला आपले शेत सांभाळत पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात पॉवरलूमवर काम करुन आपला उदरनिर्वाह चालवायची.कारण फक्त शेतीवर घर चालन कठिण होत.आता त्यांची पत्नी एकाकी पडल्याने बायपासमधील जमीनीचा तुकडाच त्यांना आधार.मुलं नसल्याने त्यांना आता हालाखिच जीवन जगाव लागल्याने पत्नी बोलते कि माझ्या नवऱ्याचा बळी महामार्ग प्राधिकरणानेच घेतला.आतातरी प्रशासन,महामार्ग प्राधिकरण खाते बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द करणार कि असे अनेक बळी गेलेतरी चालतील पण बायपास करणारच या मुजोरीत वागणार ? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांतून उपस्थित होतोय

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!