काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, मराठी भाषिकांच्या वतीने अनेक वर्षाच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सर्व मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला त्याचे औचित्य साधून युवा समितीच्या वतीने बेळगावमधील मराठी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला .सीमाभागातील मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि मराठीवर होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्याचे काम बेळगावमधील सर्व मराठी भाषिक पत्रकार करत आहेत , त्याच्या कार्याची दखल घेवून हा सन्मान करण्यात आला .