माळमारुती पोलिसांकडून तपास सुरु
वडिलांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून मुलीने पोलिसात तक्रार दाखल केल्याची घटना बेळगाव शहरात उघडकीस आली आहे. दरम्यान, अनोळखी जी व्यक्ती घरात घुसली त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे .
बेळगावातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी संतोष दुंडप्पा पद्मन्नावर यांचा ९ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूबाबत संशय वाढत आहे. संतोष दुंडप्पा पद्मन्नवर यांची मुलगी संजना हिने वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय व्यक्त करत बेळगाव येथील माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या पार्श्वभूमीवर माळमारुती पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या पथकासह सुमारे 5 तास सतत तपास करत घरातून काही वस्तू जप्त केल्या आहेत. संतोष पद्मन्नावर यांची पत्नी उमा पद्मन्नावर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे.
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलीला वडिलांच्या मृत्यूचा संशय आला . अंत्यविधी आटोपताच आईने आपल्या मुलीला रागाने आधी अंघोळ कर आणि मग घरातील सीसीटीव्ही फुटेज तपास, सांगितले. मी अंघोळ करून परत येऊन बघितले तोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज गायब झाले होते. मी आईला विचारले तर आई म्हणाली की तुझे भाऊ काहीतरी करायला गेले आणि डिलीट केले. सुजल आणि अकुल पद्मन्नावर या दोन भावांना विचारणा केली असता, त्यांच्या आईनेच सीसीटीव्ही फुटेज हटवण्यास सांगितले, अशी प्राथमिक माहिती जाणकार सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे .
मात्र, शेजाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोघेही घरात घुसले आणि ४० ते ४५ मिनिटांनी बाहेर आल्याचे दृश्य कैद झाले.
माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय कालीमिर्ची यांनी तपास हाती घेतला असून तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य बाहेर येणार आहे .