ऑनलाईन बेटिंग खेळणाऱ्या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी
ऑनलाईन बेटिंग गेममुळे होणाऱ्या आपत्तींपासून बचवाची मागणी
ऑनलाईन बेटिंग खेळणाऱ्या वेबसाईटवर बंदी घालण्याची मागणी
ऑनलाईन बेटिंग गेममुळे अनेक नागरिकांचे कुटुंब उध्वस्त होत आहे यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. तसेच अनेक युवक व विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
त्यामुळे या ऑनलाईन गेमवर बंदी घालावी अशी मागणी कर्नाटक सेना या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आधीच बेंगळुरूच्या व्यावसायिक पोलीस ठाण्यात अनधिकृत बेटिंग वेबसाईट चालवणाऱ्या दोन बुकींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि लोकांना याची अधिकाधिक जाणीव व्हावी आणि अशा प्रकारे लोकांची फसवणूक करण्याच्या हेतूने, ही विनंती केली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमिंग वेबसाइट आणि लोकांची फसवणूक करणाऱ्या ऍप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे