बेळगाव : राष्ट्रीय छात्र सेनेसाठी (एनसीसी) उत्कृष्ट योगदान देत असल्याबद्दल मराठा मंडळ संचलित सेंट्रल हायस्कूल मधील एनसीसी चीफ ऑफिसर व सहाय्यक शिक्षक पी बी मास्तीहोळी यांचा संस्थेतर्फे खास सत्कार करण्यात आला.
सेंट्रल हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक बी . एम. पाटील, जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी . पाटील, मराठा मंडळाच्या उपप्राचार्य एल एन शिंदे, सेंट्रल हायस्कूलचे माजी विद्यार्थी नौदलातील चीफ ऑफिसर रवी बेळगुंदकर आणि डी मीडियाचे दीपक सुतार उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते एनसीसी शिबिरात पथसंचलनामध्ये (ड्रिल) प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल एनसीसी चीफ ऑफिसर पी. बी मास्तीहोळी यांचा शाळेच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी शाळेचे सहशिक्षक डी. टी. सावंत यांनी सत्कार मूर्ती मास्तीहोळी यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारासह इतर पुरस्कार तसेच त्यांचे झालेले सत्कार याबद्दल सविस्तर माहिती दिली. मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू मॅडम यांनी 2003 मध्ये पी. बी . मास्तीहोळी यांचा सत्कार करून विशेष प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले. सदर सत्कार समारंभात प्रसंगी प्रमुख पाहुणे रवी बेळगावकर यांनी ‘करिअर इन डिफेन्स फोर्स’ या विषयावर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले. शेवटी आर. व्ही. राक्षे यांच्या आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली