बेळगाव : गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ डिसेंबर रोजी खानापूर येथे मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या संमेलनाला अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी उपस्थित राहणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून गुंफण साहित्य परिषद महाराष्ट्रासह सीमा भागातील विविध गावांमध्ये मराठी साहित्य संमेलन घेत असून आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या संमेलनांना ज्येष्ठ साहित्यिकांनी हजेरी लावली असुन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबाबत खानापूर येथे आयोजित केले जाणारे संमेलन मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा निर्णय गुंफण साहित्य परिषद आणि शिवस्वराज्य संघटनेच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती गुंफण साहित्य परिषदेचे गुणवंत पाटील व शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी दिली