बेळगाव प्रतिनिधी
टिळकवाडी येथील सोमवार पेठ येथे नव्या जागेत भव्य दालनात कार्यान्वित झालेल्या अत्रीवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेदिक केंद्राने वीस वर्षे बेळगाव आणि परिसरातील ग्राहकांची वैद्यकीय सेवा दिली आहे .येत्या दि. 29 रोजी या केंद्राचा वर्धापन दिन धन्वंतरी दिनाच्या निमित्ताने साजरा होत आहे. अशी माहिती केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. रुपेश साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या दिनाच्या निमित्ताने विशेष धन्वंतरी याग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. आयुर्वेदिक जीवनशैलीचा स्वीकार केल्यास नागरिकांना आरोग्य रक्षण साध्य होऊ शकते त्यासाठी आहार आणि नियमन याविषयी नागरिकांनी विशेष लक्ष पुरवावे यासाठी आपण जागृती कार्य करीत आहोत. योग साधनेची विशेष शाळा या केंद्रामध्ये कार्यान्वित आहे. यामधून नागरिकांना आरोग्य विषयक रक्षणासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. मैसूर येथील एका संस्थेने त्यांच्या कार्याचा नुकताच गौरव केला आहे. त्यांना बेस्ट मेडिकल प्रॅक्टिशनर हा सन्मान जाहीर झाला असून याचे वितरण रविवार दि. 28 रोजी मैसूर येथे होणार आहे. यापूर्वी देखील त्यांना अनेक नामवंत संस्थांकडून विशेष पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचा वसा त्यांनी मागील वीस वर्षांपासून जपला आहे. बेळगावच्या बरोबरीने त्यांनी सांगली, इस्लामपूर, कराड, सावंतवाडी, रत्नागिरी, कोल्हापूर, हुबळी, पणजी आणि मडगाव या ठिकाणी चिकित्सा केंद्रे उभी करून आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य जागृतीचे कार्य केले आहे. आयुर्वेदाच्या जागृतीसाठी अनेक माध्यमातून लिखाण देखील केले आहे वेगवेगळे आजार घरगुती औषधे प्रभावी पंचकर्म दिनचर्या तथा ऋतुचर्या औषधी वनस्पती अशा विविध अशा विषयांवर प्रकाश टाकणारी अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. त्यांना लाभलेल्या या नव्या सन्मानाबद्दल त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.