राज्योत्सव मिरवणुकीनिमित्त शहरातील रहदारी अन्य मागनि वळवण्यात येणार आहे. तसे पत्रक पोलिस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिले आहे.
l
जिल्हा स्टेडियमपासून राज्योत्सव मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. हि मिरवणूक कोल्हापूर सर्कल , डॉ. आंबेडकर रोड, चन्नम्मा चौक, काकती वे, शनिवार खुट, गणपत गल्ली, कांबळी खुट, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, ध. ही मिरवणूक संभाजी चौक, यंदे खुट, कॉलेजरोडमार्गे सरदार कॉलेजच्या मैदानावर येऊन संपेल.
संपूर्ण मिरवणूक शहरातून निघणार असून यासाठी शहरातील रहदारी मार्गात बदल करण्यात येणार आहे.
१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून २ नोव्हेंबर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत खाली दिलेल्या मार्गावरून दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व अन्य सर्व अवजड वाहनांना बंदी राहणार आहे.