उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे .राज्योसतव असल्याने चिकोडी, संकेश्वर, कोल्हापूरकडून केएलईमार्गे येणारी वाहने जिनाबकुळ सर्कलपासून उजवीकडे वळवून घेत बॉक्साईट रोड, हिंडलगा गणपती मंदिरकडून कॅम्पमधून आरगन तलाव, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शर्कत पार्कपासून ग्लोब थिएटरमार्गे खानापूर रोडला सोडण्यात येतील.
गोवा, व खानापूरकडून येणारी वाहने ग्लोब थिएटरजवळ डाव्या बाजूला वळवून वरच्या मार्गाने परत बॉक्साईट रोडमार्गे राष्ट्रीय महामार्गाकडे सोडण्यात येतील.
जिजामाता सर्कल, देशपांडे पेट्रोल पंपाकडून नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूटकडे येणारी सर्व वाहने पिंपळ कट्ट्याजवळून डावीकडे वळवून पाटील गल्ली, शनी मंदिरजवळून स्टेशन रोडमार्गे खानापूरकडे सोडली जातील.
जुना पीबी रोडमार्गे खानापूरकडे जाणारी सर्व वाहने जिजामाता सर्कलजवळ उजव्या बाजूला वळूनसर्कीट हाऊस, अशोकस्तंभ सर्कल, कनकदास सर्कलकडून महामार्गाकडे सोडण्यात येणार आहेत