देसूर तालुका बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने भव्य बैलगाडा पळविण्याची जंगी शर्यत गुरुवार दि. ७ ते रविवार दि. १० पर्यंत चालणार आहे. या शर्यतीचे उद्घाटन गुरुवार दि. ७ रोजी सकाळी ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून ही जंगी शर्यत मोठ्या व लहान अशा दोन गटात होणार असून मोठ्या गटातील पहिले बक्षीस ५१ तोळ्याची चांदीची गदा, दुसरे बक्षीस ४१,००१, तिसरे बक्षीस ३१,००१, चौथे बक्षीस २५,००१, पाचवे बक्षीस २१,००१ रुपये अशी एकूण १७ बक्षिसे देण्यात येणार आहेत. ‘त्याचप्रमाणे लहान गटासाठी पहिले बक्षीस २५ तोळे चांदीची गदा, दुसरे २१,०००, तिसरे १८,०००, चौथे १६,०००, पाचवे १४,००० रुपये अशी एकूण १५ बक्षिसे देण्यात येणार आहेत. बेळगाव तालुक्यात सर्वात मोठी ही जंगी शर्यत दि. ७ ते दि. १० असे चार दिवस चालणार असून रोज सकाळी ८ वाजता शर्यतीला सुरुवात होवून रात्री ९ वाजता बंद करण्यात येणार आहे. तरी हौशी बैलजोडी मालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे
देसूर येथे बैलगाडा पळविण्याची शर्यत उद्यापासून
By Akshata Naik
Previous articleअल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी एकास अटक