शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबन्यांग यांची माहिती
एसडीए रुद्रेशच्या तहसीलदार कार्यालयात आत्महत्या प्रकरणी तीन जणांवर खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबन्यांग यांनी सांगितले.
गुरुवारी बेळगावात पत्रकारांशी ते बोलले यावेळी ते म्हणाले तहसीलदार बसवराज अशोक कब्बळीगियर, सोमू यांच्या विरोधात आम्ही तपास सुरू केला आहे आणि काही जणांचे स्टेटमेंट मिळाले आहेत.
रुद्रेश मोबाईल त्याच्या घरात आहे, तो पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आदेश आम्ही कुटुंबीयांना दिले आहेत. मग आम्हाला अचूक माहिती मिळेल. शेवटच्या वेळी कोणाशी बोललो होतो त्याची तपासनी करत आहोत
आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत. बँक स्टेटमेंट तपासण्याची गरज आहे. त्याने ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मेसेज केला आहे. आम्ही मेसेजचा स्क्रीनशॉट पाहिला आहे. मोबाईल मिळाल्यानंतर सर्व कळेल.
यात मंत्र्यांचे पीए सोमू आहेत अशी माहिती समोर आली आहे याबाबत आम्ही तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले