राज्य सरकारच्या पाचव्या युवा निधी हमी योजनेसाठी अर्ज
स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २०२४-२५ सालात पदवी, डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या इच्छुकांनी युवा निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सेवा सिंधू वेबपोर्टलवर अर्ज करावेत. अर्ज केलेल्या बेरोजगारांना प्रत्येक महिन्याला बेरोजगार असल्याची स्वयंघोषणा करावी लागणार आहे. स्वयंघोषणा न करणाऱ्या बेरोजगारांना निधी देण्यात येणार नाही. अधिका माहितीसाठी सुवर्ण सौध येथील जिल्हा रोजगार विनिमय कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालकांनी केले आहे
युवानिधी योजनेसाठी अर्जाचे आवाहन
