केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला देशाचा अर्थसंकल्प अतिशय उत्तम असून शेतकरी, महिला, सामान्य माणूस आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या व सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी संसदेमध्ये 2025 -26 सालचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पासंदर्भात बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी सर्वप्रथम ‘एकदम मस्त’ अशी प्रतिक्रिया दिली. हा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, महिला, सामान्य माणूस आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल असून अनुसूचित जाती जमातींच्या महिला आणि स्टार्ट अप्स यांच्यासाठी देखील फायद्याचा आहे. 12 लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय लोकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. रोजंदारी कामगारांना या अर्थसंकल्पामुळे बरीच मदत मिळेल. एकूणच कृषी, पायाभूत सुविधा, उद्योग, आरोग्य आणि शिक्षणासाठी देखील हा अर्थसंकल्प अतिशय उत्तम आहे, असे डॉ. सरनोबत यांनी सांगितले.