बेळगावातील धनगर समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध करण्यात आला त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय गाठून ज्या व्यक्तीने आमच्या मेंढ्या चोरल्या आहेत त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
बेळगाव शहरासह ग्रामीण भागात अनेक मेंढपाळ आहेत. या मेंढपाळांचे जवळपास 160 मेंढ्या बकरी चोरण्यात आली आहेत. तसेच ही बकरी चोरून कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या वेगवेगळ्या गावात बकरींची विक्री करण्यात येत आहे. या संबंधित धनगरांनी मेंढ्या चोरणाऱ्या चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मेंढ्या चोरणाऱ्या चोरट्यांना महाराष्ट्रातील पन्हाळा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. चोरट्यांवर कारवाई करावी आणि चोरी झालेल्या बकऱ्यांचा मोबदला मेंढपाळांना मिळवून द्यावा अशी मागणी आज आंदोलन करून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.