कंग्राळी खुर्द येथील रहिवासी रिटायर्ड सुभेदार पुंडलिक गौंडवाडकर यांनी खूप वर्षापासून रॉटवेलर कुत्रा घरी बाळगतात अगदी लहान मुलासारखं त्याचं संगोपन करत होते एका सदस्या प्रमाणे त्याची वाढ केली . अंगा खांद्यावर खेळणारा कुत्रा पायाला काटा लागल्याने लंगडत होता पुंडलिक गौंडवाडकर यांनी त्याला जवळ घेऊन पायाचा काटा काढण्याचा प्रयत्न केला अचानक कुत्र्याने त्यांच्या हातावर अटॅक केला त्याची पकड इतकी मजबूत होती दहा मिनिटे सर्व परिवाराने मिळून सोडवण्याचा प्रयत्न केला तरीपण हात सोडायला तयार नाही मग त्याला चेन लावून ओढण्यात आले हाताचा मासाचा लचका घेऊनच कुत्र्याने हात सोडला
अक्षरशः रक्तबंबाळ परिस्थितीत उपचारासाठी त्यांना के एल इ हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे. आर्मी मध्ये ड्युटी केल्यामुळे खूप धाडसाने व शांतपणे मरण यातना सहन करत त्यांनी आपली सोडवणूक करून घेतली