वृद्ध गंभीर जखमी-कणकुंबी मधील घटना
बेळगाव: कणकुंबी चेकपोस्टजवळ अस्वलाने एका वृद्धावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
दशरथ वरंडीकर (६०) नावाचा स्थानिक रहिवासी आज बुधवारी पहाटे जंगलात गुरे चारण्यासाठी गेला असताना त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला. जंगलाच्या बाजूने गुरे चरण्यासाठी सोडून तो परत येत असताना अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यामुळे त्याचा चेहरा फाटला आहे .जखमी व्यक्तीला बेळगाव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. खानापूर वन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आजूबाजूला कोणीही फिरू नये असे आवाहन करत आहेत