अलतगा कडोली संपर्क रस्त्यावर अलतगा हद्दीत भले मोठे खड्डे पडले असून रस्तात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने या खड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे दुचाकी वाहन तसेच मालवाहू रिक्षा चालकांनी या रस्त्यावरुन या प्रवास करण्याचे बंद केले आहे विषेश म्हणजे अगसगे चलवेनहट्टी हंदिगनूर म्हाळेनट्टी या परिसरातून विद्यार्थीसह प्रवाशांनी भरलेली परीवाहनची बस वाहतूक सुरू आहे त्यामुळे सदर रस्ताचा अंतर पार करण्यासाठी वेळ तर जातोच पण जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे हा रस्ता पार झाल्यावर सुटकेचा निःश्वास सोडला जातो त्यामुळे प्रवासी बस सकाळी आणी संध्याकाळी आशी दोनच फेरा या ठिकाणावरुण जात आहे. प्रशासन मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे का शंका व्यक्त होत आहे.
अलतगा कडोली संपर्क रस्त्या म्हणजे मृत्युचा सापळा
