महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे टिळकवाडी येथील युवा समितीच्या कार्यालयात मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 2013 पासून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक श्री शिवाजी मंडोळकर यांनी कुसुमाग्रजांच्या फोटो पूजन केले तर युवा समिती चे अध्यक्ष शुभम शेळके यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी शुभम शेळके म्हणाले की मराठी शाळा ही मराठी भाषेचा पाया आहे आणि युवा समिती सुरुवातीपासूनच प्रथम प्राधान्य मराठी शाळांनाच देत आहे.तसेच शैक्षणिक उपक्रमांतर्गत मातृभाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहे आणि यापुढेही मराठी शाळा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यासाठी सदैव कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त केला .
त्यानंतर या समितीचे उपाध्यक्ष श्री अंकुश केसरकर म्हणाले की भाषा संस्कृती हे आपल्या देशाचे मूळ आहे आणि भाषा टिकली तरच देश टिकतो पण गेल्या काही वर्षात ‘ बेळगावच्या प्रशासना कडून सातत्याने मराठी भाषेची गळचेपी होत आहे म्हणूनच तिथल्या प्रशासनाकडून आमच्या मातृभाषेला व संस्कृतीला धोका आहे म्हणूनच हा प्रश्न लवकरात लवकर सुटणे ही काळाची गरज असून आणि महाराष्ट्रात जाऊनच आम्ही आमची मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध करू शकतो असा विश्वास व्यक्त केला
युवा समितीचे खजिनदार मनोर हुंदरे म्हणाले की मराठी भाषा गौरव दिवस हा फेसबुक व्हाट्सअप स्टेटस पुरता मर्यादित न ठेवावा प्रत्येकाने आपल्या भागातील मराठी शाळा समृद्ध सुस्थितीत आणि त्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे अशी आशा व्यक्त केली
यावेळी प्रतीक पाटील सिद्धार्थ चौगुले शिवाजी मंडोळकर आदींनी विचार मांडले आणि मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .त्यानंतर या समितीचे उपाध्यक्ष सचिन केळवेकर यांनी उपस्थित युवा समितीचे पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते आणि मराठी नागरिक यांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले
यावेळी कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, सौरभ जोशी, प्रवीण रेडेकर, साईनाथ शिरोडकर, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, जोतिबा पाटील, अजय सुतार, प्रतीक पाटील, दत्ता पाटील, आकाश भेकने, महेश जाधव दिनेश मोरे आदी उपस्थित होते.