बिजगर्णी येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री कलमेश्वर फार्मर्स प्रोसेसिंग सोसायटी च्या वतीने भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.बुधवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता ब्रह्म लिंग मंदिर बिजगर्णी येथे या कुस्त्या होणार आहेत.
या कुस्ती मैदान मध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती उत्तर प्रदेश चॅम्पियन, गुरुभर्दि आखाडा दिल्ली चा पैलवान बंटी कुमार यांची लढत महाराष्ट्र चॅम्पियन मोतीबाग तालमीचा पैलवान अरुण भोंगाळे यांच्या मध्ये होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पै सौरभ राशिवडे विरुद्ध वस्ताद राजेंद्र शिंदे यांचा पट्टा नाथा पवार तर तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन पै रोहित पाटील कंग्राळी विरुद्ध मुंडे तालीम कोल्हापूरचा विक्रम शिनोळी मध्ये होणार आहे .
यासह 21 कुस्त्या नेमल्या आहेत, यामध्ये कर्नाटक व महाराष्ट्र पैलवान एकमेकाविरुद्ध कुस्ती खेळणार आहेत.या आखाडा समारंभाचे अध्यक्ष मोनाप्पा भास्कळ असणार आहेत, आखाडा चे उद्घाटन माजी आमदार संजय पाटील,आखाड्याचे पूजन भाजप नेते विनय कदम यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी नारायण झंगरुचे, विशाल कोडते,अमोल जाधव ,नामदेव मोरे ,शशिकांत मोरे ,रवींद्र हरगुडे ,संजय पाटील ,यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कुस्ती मैदानासाठी कुस्ती समालोचक म्हणून राशिवडे गावचे प्रसिद्ध समालोचक श्री कृष्णा चौगुले उपस्थित राहणार आहेत. तरी हौशी पैलवान बंधूनी व नागरिकांनी या कुस्ती आखाडा ला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे