निपाणी पालिकेचे पथदीप बसविण्याकडे दुर्लक्ष –
निप्पाणी शहरातील मुरगुड रोडवरील देवचंद कॉलेज येथे पथदीप लावण्यात आली आहेत मात्र यातील काही पथदीप बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
येथील पथ दीप बंद असल्याने अनेक अपघात घडत आहेत तसे सरपटणारे प्राणी देखील मृत्यू पावत आहेत. याबाबत अनेक वेळा तक्रार देऊन देखील याकडे प्रशासनाने कोणतेच लक्ष पुरवले नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.
निपाणी येथील समाधी मठ पासून ते देवचंद कॉलेज पर्यंत 210 स्ट्रीट लाईट व 210 कलर लाईट हंडी लाखो रुपये खर्चून बसविण्यात आले आहेत मात्र आजच्या या घडीला येथे फक्त 90% लाईट बंद आहेत त्यामुळे नगरपालिका प्रशासनांनी या ठिकाणी मोठा अनर्थ घडण्याआधी येथील पथदीप पूर्ववत सुरू करावेत आणि जनतेच्या समस्या मोकळ्या कराव्यात अशी मागणी होते.