दुसऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये शनिवारी पूर्ण दिवस शाळा
शनिवार दि. २० सप्टेंबरपासून शाळांना दसरा सुटी सुरू होत आहे. यंदा दसरा सुटी २० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. ७ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार असून दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल, असे शालेय शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी (प्रशासन) कळविले आहे.
दसरा सुटीनंतर सुरू होणाऱ्या
शैक्षणिक सत्रामध्ये शनिवारी पूर्ण दिवस शाळा घेण्यात याव्यात, असा आदेश शालेय शिक्षण खात्याच्या उपसंचालकांनी दिला आहे. मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळांना सुटी देण्यात आली होती. सुटीचे दिवस भरून काढण्यासाठी शनिवारी पूर्ण दिवस शाळा भरवावी, असे खात्याने म्हटले होते.