महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २५ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती कौन्सिल विभागाला कळविण्यात आली असून सभेचा अजेंडा मात्र अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे अधिकृतरित्या सभेची नोटीस काढण्यात आलेली नाही.
महापालिकेची यापूर्वी २५ऑगस्ट रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती. यानंतर गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण करण्यात आली आहे. अजेंडा सभा आयोजित ठरल्यानंतर कौन्सिल विभागाकडून अधिकारी, पदसिद्ध सदस्य, खासदार, आमदार, नगरसेवक, सरकार नियुक्त नगरसेवकांना नोटीस पाठविली जाणार आहे