आजाराला कंटाळून कडोली (ता. बेळगाव) येथील एका महिलेने विहिरीत उडी टाकून आपले जीवन संपविले आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गीता नारायण फडके (वय ५२) राहणार कडोली असे त्या दुर्दैवी
महिलेचे नाव आहे. बुधवार दि. १७ सप्टेंबरला निंगाप्पा फडके यांच्या विहिरीत उडी टाकून या महिलेने आपले जीवन संपविले आहे कॅन्सरला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे समजते. घटनेची माहिती काकतीचे पोलीस समजताच उपनिरीक्षक मृत्युंजय मठद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला



