राज्यात प्रथमच महिला दिना दिवशी केले रक्तदान स्त्री म्हणजे मातृत्व, दातृत्व, नेतृत्व व कर्तृत्वाच जिवंत उदाहरण.जन्मपासूनमरेपर्यंत महिलांचं घरातील,समाजातील स्थान अग्रगण्य आहे.समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा सिंहाचा आहे.
ज्या दिवशी महिला दिन सगळीकडे साजरा केला जातो, त्यानिमित्ताने त्यांचा गौरव केला जातो त्याच दिवशी शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.माधुरी जाधव यांच्या फौंडेशनच्या वतीने महिलांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.आज रक्ताची मोठ्याप्रमाणात गरज भासत असून रुग्णांना योग्य वेळी रक्त पुरवठा व्हावा ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंचवीस महिलांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता डॉक्टर चेक अप नंतर काही महिलांचे एच बी कमी असल्या कारणाने रक्तदान करू शकले नाहीत. त्यातील 17 महिलांनी यावेळी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी के एलई इस्पितळाचे रक्त पेटी चे प्रमुख डॉक्टर वीरगे सर आणि डॉक्टर धारवाड सर यांच्या नेतृत्वाखाली सहकारी डॉक्टर्स व पारिचारिका उपस्थित राहून त्यांनी रक्तदान शिबिरासाठी मोठी मदत केली ज्या महिलांनी रक्त दान केल्या व परिचारिकांनी सहकार्य केल्या त्यांना महिला दिनानिमित्ताने भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी समाजसेवक आकाश हलगेकर यांनी या ठिकाणी महिलांसाठी केक आणून महिलांच्या वतीने केक कापून महिला दिन साजरा करण्यात. आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मेघा भंडारी या उपस्थित होत्या यांनी सर्व स्त्रियांना रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी माधुरी जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव, रीटा पाटील स्मिता शिंदे, ज्योती मिरजकर, योगिता पाटील, आरती निपाणीकर, सोनल काकतीकर,विनय पाटील, संतोष तळीपत्तार, शुभम दळवी ,रिषभ अवलक्की, शाबाज जमादार, निलेश गुरखा हे सर्व उपस्थित.