कर्नाटक राज्यातील न्यायधीश विश्वनाथ मुगती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते गुलबुर्गा तिसरे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे न्यायालयात जाण्यासाठी तयार होत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना ताबडतोब जयदेव हृदय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात नेत असताना वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने विश्वनाथ यांचे निधन झाले.
न्यायालयात जाताना न्यायाधीशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू-गुलबर्गा येथील घटना
By Akshata Naik