सौंदत्ती शहरातील एपीएमसीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मृतदेहाशेजारी विटा आणि दगडही सापडले आहेत, ज्यामुळे हत्येचा संशय अधिक बळावला आहे. घटनेची माहिती मिळताच सौंदत्तीचे सीपीआय धर्मकर धर्मट्टी आणि पीएसआय के. एम. बन्नूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिसराची पाहणी केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही हत्या कोणी केली आणि त्यामागचे कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.
डोक्यात दगड घालून एकाच खून -सौन्दत्ती मधील घटना
