बेळगाव :
पांगुळ गल्ली मध्ये रस्ता रुंदीकरण करण्यात आला. मात्र रस्ता रुंदीकरण करुन देखील व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने आज महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांगुळ गल्लीत अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
यापूर्वी येथील व्यावसायिकांनी तसेच नागरिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले होते त्यामुळे महानगरपालिकेला रस्ता रुंदीकरण करण्यास पांगुळ गल्लीत अतिक्रमण करावे लागले. या अतिक्रमणात काही नागरिकांची घरे गेली. येथील व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने महापालिकेला नाईलाजास्तव ही कारवाई करावी लागली.
मात्र कारवाई करून देखील त्यातून काही निष्पन्न झाल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेने पांगुळ गल्लीतील व्यवसायिकांना अनेक वेळा सांगून देखील ते रस्त्यावरचे अतिक्रमण करत आहेत. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
तसेच या ठिकाणी व्यापारीवर्ग गटार सोडून तीन फूट आपला माल विक्रीसाठी लावत असल्याचे दिसून येत आहे.यामुळे देखील रहदारीला अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते.
गेल्या कित्येक दिवसांपासून पांगुळ गल्लीत ही समस्या जैसे थे आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा महापालिकेने याठिकाणी अतिक्रमण मोहीम राबविली. तसेच रस्त्यावर स्टॉल थाटण्यात आलेल्या व्यवसायिकांना सक्त सूचना करुन कारवाई करण्याचा इशारा दिला.