No menu items!
Thursday, December 5, 2024

वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे गोव्यात लोकार्पण

Must read

स्वा. सावरकर हे एक द्रष्टे राष्ट्रपुरुष, तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे मानबिंदू होते. स्वा. सावरकर यांच्या विचारांचे आचरण न केल्याने देशाची मोठी हानी झाली. स्वा. सावरकर यांचे विचार देशाने आचरले असते, तर देशाची फाळणी झालीच नसती. उलट देश विश्‍वगुरु बनला असता, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर नव्याने प्रकाश टाकणार्‍या आणि श्री. उदय माहुरकर आणि सहलेखक श्री. चिरायू पंडित यांनी लिहलेल्या ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिवेंटेड पार्टिशन’ या ग्रंथाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समिती आयोजित हा सोहळा पणजी येथील गोमंतक मराठा समाज राजाराम स्मृति सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष श्री. प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलीस महासंचालक) प्रमुख अतिथी म्हणून ‘ऑनलाईन’ माध्यमातून उपस्थित होते.

शंखनाद, दीपप्रज्वलन, स्वा. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यानंतर श्री क्षेत्र तपोभूमीचे धर्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांचा संदेश वाचन करण्यात आला. देशभक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवली पाहिजे, असे आशीर्वचन स्वामीजींनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस म्हणाले की,* स्वा. सावरकर यांचे विचार ७० वर्षे उलटूनही देशासाठी एक वैचारिक संपत्ती आहे. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे स्वा. सावरकर यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे दायित्व आता हिंदूंचे आहे. या पुस्तकाचे वाचन केल्याने हिंदूंना नवीन ऊर्जा प्राप्त होईल. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे या वेळी म्हणाले की, ‘एकवेळ माझी ‘मार्सेलिस’ची उडी विसरलात, तरी चालेल; पण मी ‘हिंदु संघटक’ आहे, हे विसरू नका’, असे स्वा. सावरकर यांनी म्हटले होते. हेच विचार स्वीकारून आपल्याला स्वा. सावरकरांचे हिंदु राष्ट्राचे कार्य पुढे न्यायचे आहे. ‘चरख्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’ असे म्हटले जाते, तर गोवा, दमण-दीव या भागाला स्वातंत्र्य मिळायला 1961 का उजाडले ? गोव्यासाठी सैनिकी कारवाई का करावी लागली ? स्वा. सावरकरांचे विचार आपल्याकडे आहेत. या विचारांच्या आधारे यापुढे देशाचे होणारे विभाजन आपण रोखू शकतो.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. प्रवीण दीक्षित या वेळी म्हणाले की,स्वा. सावरकर यांच्या विचारांतून स्फूर्ती घेऊन अनेकांनी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे आजच्या काळातही अनुकरणीय आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेश बेहरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समितीचे गोवा राज्य समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केले. हा कार्यक्रम ट्विटर आणि यू-ट्यूब या सामाजिक माध्यमांतून हजारो लोकांनी पाहिला. संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!