बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज मराठा विकास प्राधिकारचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. मारुतीराव मुळे यांची बंगळूर येथे भेट घेऊन त्यांचा गौरव केला.
ते म्हणाले, आमच्या भागात ज्या मराठा समाजाची संख्या लक्षणीय आहे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी आम्ही नक्कीच काम करू, अशी ग्वाही देतो.
कर्नाटक सरकारने मंजूर केलेली ५० कोटींची रक्कम मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरली जाईल.
मराठा समाजाचा विकास आणि कर्नाटकातील मराठ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.
तसेच माननीय मुख्यमंत्री श्री. बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन वैयक्तिकरित्या आणि मराठा समुदायाच्या विकास प्रकल्पांसाठी या समाजाला देण्यात आलेल्या ५०.०० कोटी निधीबद्दल त्यांचे आभार मानण्यात येणार आहेत.असे आमदार बेनके यांनी सांगितले.