No menu items!
Saturday, May 31, 2025

राज्यात बियर महागणार

Must read

राज्य सरकारने बियरवरील अबकारी कर १० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश दिला असून सात दिवसांच्या आत आक्षेप नोंदवावा, असे सांगितले आहे.
राज्यात बियरवरील अतिरिक्त अबकारी कर उत्पादन खर्चाच्या १९५ टक्के आहे. तो २०५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बियरची किंमत दहा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
दरवाढ बिअरच्या ब्रँडनुसार बदलणार आहे. यापूर्वी बियरसाठी दोन स्तरावर करप्रणाली होती. कमी स्तरावरील ब्रँडसाठी प्रतिलिटर १३० रुपये कर लागू केला जात होता. तर इतर ब्रँडसाठी शेकडानिहाय कर आकारला जात होता. आता ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. सर्व बियरसाठी समान २०५ टक्के कर निश्चित करण्यात आला आहे. सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार व्हिस्की, जीन आणि रम यासह विविध मद्याच्या किमतीत वाढ होणार आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!