बेळगाव मध्ये मालवाहू गाडी आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चोर्ला असलेल्या जांबोटी रोडवर घडली आहे. या अपघातात दुचाकी पूर्ण चिरडली गेली आहे. तसेच अद्याप अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव समजू शकले नाही खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेटून पाहणी केली आहे. ही घटना खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे
बेळगाव मध्ये मालवाहू गाडी आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात
By Akshata Naik

Must read
Previous articleभव्य स्केटिंग स्पर्धा 2025राजहंसगड किल्ला बेळगांव
Next articleराज्यात बियर महागणार