खानापुर येथील देवालटी जत्रे करिता जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ आणि जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर जत्रा 12 ते 20 एप्रिल दरम्यान होणार असून या ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा विद्युत पुरवठा तसेच यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे .
याचबरोबर या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली असून सदर निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना डॉ सोनाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली जत्रा कमिटीच्या सदस्यांनी दिले आहे.