रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद सोडवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा मागणीचे निवेदन बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्रमोदी यांना दिले आहे .
रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे भारतावर उपासमारीची वेळ आली आहे .दोन देशामध्ये चाललेल्या या युद्धामुळे सर्व किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे .त्यामुळे राष्ट्रांमधील तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्वरीत खबरदारीची पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .