एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे कर्नाटकच्या ७८ भागात जोरदार छापेमारी सुरू केली. बेंगळूरमधील ३ ठिकाणांसह राज्यात ७८ ठिकाणी एसीबीचे छापे टाकण्यात आले.
१८ सरकारी अधिकाऱ्यांच्या ७८ ठिकाणी एसीबीच्या २०० हून अधिक अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले आहेत. कथित बेहिशेबी मालमत्तेच्या पार्श्वभूमीवर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी १८ सरकारी अधिकाऱ्यांच्या ७५ ठिकाणांवर छापे टाकले.
बसवराज शेखर रेड्डी पाटील, कौजलागी विभागाचे कार्यकारी अभियंता, गोकाक यांच्यावरही छापा करण्यात आला. एसीबीचे अधिकारी वास्तविक उत्पन्न आणि मालमत्तेचे प्रमाण तपासत आहेत.