सर्वांना उत्सुकता लागते ती होळीची होळी हा आपल्या महत्त्वाचे सण आणि पैकी एक जण मराठी वर्षाच्या सरते शेवटी येणारा सण म्हणजे होळी .धुलीवंदन रंगपंचमी फाल्गुन पौर्णिमेला साजरी होणारी होळी हुताशनी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखले जाते.
होळीच्या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रंगपंचमीनिमित्त आकर्षक पिचकाऱ्या रंग मुखवटे व हर्बल स्प्रे खरेदीसाठी बाल चमूसह युवकांची स्टॉलवर झुंबड दिसत आहे .बाजारपेठ देखील होळीसाठी सज्ज झालेली दिसून येत आहे
त्यानिमित्त बाजारपेठेत लहान मुलींसाठी बार्बी डॉल तसेच पाइपमध्ये विविधता बाजारपेठेत दाखल झाली आहे .याच्या किमती 30 ते 300रुपयांपर्यंत आहेत मुलांमध्ये छोटा भीम डोरेमॉन टॉम अँड जेरी तसेच अनेक विविध नमुने उपल्बध आहेत .याची किंमत 300 ते 600रुपयांपर्यंत आहे .रंगांमध्ये साडी कलर 10 रुपयांपासून ते 80 रु उपलब्ध आहेत .याच्या किमती 80 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंत आहेत .
होळी हा रंगांचा सण या दिवशी लोक आपले दुःख विसरून एकाच रंगात रंगून जातात.तसेच होळीच्या रंगात रंगून जात सर्वजण एकसारखे दिसतात .जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व एकच आहोत ही शिकवण आपल्याला होळी देते .
मात्र या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून आपल्याला थोडी काळजी घेणे देखील महत्वाचे ठरणार आहे .